आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिजामाता महाविद्यालयाचा संघ विजयी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिजामाता महाविद्यालय विरुद्ध जी टी पाटील महाविद्यालय नंदुरबार असा सामना झाला. या सामन्यात जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या संघाचा पराभव करून जिजामाता महाविद्यालयाचा संघ विजयी झाला. या सामन्यात जी टी पाटील महाविद्यालयाचे संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित वीस शटकात 114 रन केले. जिजामाता महाविद्यालय तर्फे तन्मय, पुष्कर व साहिल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत जी. टी. पी महाविद्यालयावर रोक लावला. जिजामाता महाविद्यालय संघाकडून तन्मय शहा यांनी 76 रन नाबाद करून जिजामाता महाविद्यालयाला 19.2 शटकात विजय मिळवून दिला. या सर्व खेळाडूंना प्रा. डॉ. ईश्वर धामणे यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयी संघाला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे, व प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश देवरे यांनी अभिनंदन केले.
जिजामाता महाविद्यालयाचा संघ खालील प्रमाणे आहे
तन्मय शहा | जय दोशी | यश विसपुते | सौरभ गवळी | पुष्कर आगळे | साहिल मंदाना |आदेश जाधव | मित गोयल | दुर्गेश गावित |मृणाल सैंदाणे | निखिल पाडवी | यासार शेख
जिजामाता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्या तर्फे निवड
जिजामाता महाविद्यालयाचा प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाचा विद्यार्थी कुमार शहा तन्मय प्रवीण याची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली सदर स्पर्धा ही कुरुक्षेत्र विद्यापीठ कुरुक्षेत्र येथे दिनांक 24 ते 31 मार्च 2023 दरम्यान संपन्न होणार आहे तन्मय शहा विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत तीन मॅच मध्ये आठ विकेट मिळून 80 रन केले आहेत त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सतीश देवरे सर व प्राध्यापक ईश्वर धामणे सर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले