Welcome to JES's Arts,Science and Commerce College, Nandurbar || NAAC Peer Team is scheduled to visit on 30th April and 1st May 2024 || JES's ASC College is Accrediated 'B' Grade by NAAC
नंदुरबार -९ येथील जिजामाता कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.सतीश देवरे होते. भारत सरकारच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याचे करण्याचे निश्चित केले आहे.याचाच एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.९/०१/२३ रोजी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, सचिव डॉ अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉ विक्रांतजी मोरे, संचालक मा.ऍड.राऊबाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसी-२०२०:थीम ॲन्ड प्रोस्पेक्टस ‘ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील उपस्थितांना प्रो.डॉ.एम.के.पटेल,( पूज्य सानेगुरुजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय),शहादा यांनी अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिजामाता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे नॅक कोऑर्डिनेटर प्रा.डॉ.एच.एम.पाटील तर अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.सतीश देवरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 jijamata Education Society - Powered By : NP INFOTECH