जिजामाता महाविद्यालयात ‘ हर घर तिरंगा ‘ अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न……..
नंदुरबार – १४ जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नंदुरबार उपनगरचे पोलीस निरीक्षक निकम साहेब, श्री वळवी साहेब, श्री गणेश भामरे, श्रीमती कोमल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश देवरे होते……..
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नंदुरबार यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संस्थेचे अध्यक्षा मा. श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे, सचिव मा.डॉ. अभिजीतजी मोरे,उपाध्यक्ष मा.डॉ. विक्रांतजी मोरे, ऍड.मा. राऊबाबा मोरे, यांच्या मार्गदर्शनाखालीअनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या पुढाकाराने सकाळी नऊ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात श्रमदान करण्यात आले. नंतर
महाविद्यालयापासून जवळच असलेल्या डी.एम पार्क -१ येथील शिव मंदिराच्या परिसरात मा. प्रभारी प्राचार्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच साडेअकरा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तिरंगी ध्वजाचे वाटप करून विद्यार्थ्यांना भारतीय कायदे, स्त्रियांचे होणारे शोषण, महाविद्यालयीन तरुणांची अवस्था अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. नंदुरबार उपनगरचे पोलीस निरीक्षक मा.निकम साहेब यांनी स्वतः चे व्यक्तिमत्व, करिअर घडवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा महत्वाचा असतो.त्यासाठी जिवनात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो हे सांगताना त्यांनी काही स्वतःचे अनुभवही सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ. विलास पंडित, प्रा. कांतीलाल वसावे, प्रा.डॉ.अनंत देशमुख,प्रा. सुनील सूर्यवंशी, प्रा. विजय सूर्यवंशी,प्रा. अनिल देसाई, प्रा. विजय खंडारे,श्री. त्र्यंबक मोहने, जुबेर कुरेशी सर, यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेवकांसह, महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजेश मेश्राम, प्रा.डॉ. बी एम तायडे, डॉ. हेमंत रत्नपारखी, डॉ. दुर्योधन राठोड, प्रा. जी डी महाजन, डॉ. आर के बाविस्कर, डॉ.डी.व्ही. सोनवणे,बी आर शिंदे, व इतर अनेक मान्यवर प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.एस. सोनवणे यांनी केले तर आभार डॉ. आर आर मोरे यांनी मानले