Welcome to JES's Arts,Science and Commerce College, Nandurbar || Application for Admission 2025-26 || JES's ASC College is Accrediated 'B' Grade by NAAC

जिजामाता महाविद्यालयात मशरूम फेस्टिवल संपन्न….

नंदुरबार- २ जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नंदुरबार येथे दि.२/२/२०२४ शुक्रवार रोजी मशरूम फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. या मशरूम फेस्टिवल मध्ये राजेंद्र राजेंद्र वसावे, लीलाताई वसावे, तीर्थाताई वसावे, इंदिराबाई वसावे, वनिता बाई वसावे, यांच्या अस्तंबा मशरूम उत्पादक, कोळपासा मशरूम उत्पादक, नवनिर्माण मशरूम उत्पादक, तसेच दिलीप वळवी, भगतसिंग वळवी, यांच्या काकडदा मशरूम उत्पादक, अशा अनेक मशरूम संस्थानी भाग घेतला होता…
या मशरूम फेस्टिवलचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे, मा.सचिव डॉ. अभिजीत मोरे, मा.उपाध्यक्ष डॉ. विक्रांतजी मोरे,मा.ऍड.राऊबाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सतीश देवरे यांनी पारंपरिक शेतीला पर्याय व सेंद्रिय शेतीला प्रेरणा मिळावी म्हणून या मशरूम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राजेंद्र वसावे आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्वच मशरूम उत्पादकांनी साक्री, पिंपळगाव बसवंत, नाशिक अशा अनेक ठिकाणाहून आलेल्या जिज्ञासू शेतकऱ्यांना मशरूम शेती अत्यंत कमी लागवडीत किती फायदेशीर ठरते याचे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिजामाता कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ विलास पंडित, तर आभार प्रा. डॉ. एच एम पाटील यांनी मानले

जिजामाता महाविद्यालयात ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020’ कार्यशाळा संपन्न……

नंदुरबार -९ येथील जिजामाता कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.सतीश देवरे होते.


भारत सरकारच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याचे करण्याचे निश्चित केले आहे.याचाच एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि जिजामाता शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.९/०१/२३ रोजी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, सचिव डॉ अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉ विक्रांतजी मोरे, संचालक मा.ऍड.राऊबाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसी-२०२०:थीम ॲन्ड प्रोस्पेक्टस ‘ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेतील उपस्थितांना प्रो.डॉ.एम.के.पटेल,( पूज्य सानेगुरुजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय),शहादा यांनी अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जिजामाता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे नॅक कोऑर्डिनेटर प्रा.डॉ.एच.एम.पाटील तर अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.सतीश देवरे उपस्थित होते.


प्रो.डॉ.एम.के.पटेल यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर अतिशय सखोल असे मार्गदर्शन करतांना आगामी काळात पदवी प्राप्त करुन बाहेर पडलेला विद्यार्थी हा सुसंस्कृत, कौशल्यपूर्ण आणि विविध स्तरावर जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम असेल असा विश्वास व्यक्त केला.या कार्यशाळेत हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार तसेच जिजामाता कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या जवळपास १८० विद्यार्थी,५५ प्राध्यापक, व ५० पालकांनी सहभाग घेतला. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ.डी.व्ही.सोनवणे प्रा सुनील सूर्यवंशी ,प्रा कांतिलाल वसावे,प्रा. अनिल देसाई,प्रा विजय सूर्यवंशी, श्री.त्र्यंबक मोहने, प्रा. भारत खैरनार,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विलास पंडित यांनी केले तर आभार प्रा. विजय खंडारे यांनी मानले

Naturally Grown Oysters

Naturally grown Oysters mushroom in Satpuda forest of Nandurbar district.The Tribal lady prepare oyster dish.

Copyright © 2022 jijamata Education Society - Powered By : NP INFOTECH