जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार येथे ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न:
5 सप्टेंबर 2021 रोजी
जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार येथे ” Delta Plus variant of COVID-19 Virus ” या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले. या वेबिनारचे उदघाटन मा. प्रा. डॉ.आर. एस. पाटील, अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले, शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. सुजाता पवार, एम. डी. मेडिसिन विब्रा हॉस्पिटल, कॅलिफोर्निया, अमेरिका, यांनी कोरोना ची वर्तमान कालीन परिस्थिती, भविष्यकालीन परिस्थिती, अमेरिकेतील कोरोना परिस्थिती व भारतातील कोरोणा परिस्थिती, तेसेच कोरोना डेल्टा प्लस च्या माध्यमातून नवीन रूप कसे धारण करत आहे इत्यादी विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी श्रीमती शोभाताई मोरे अध्यक्षा जिजामाता शिक्षण संस्था, नंदुरबार या उपस्थित होत्या. या वेबिनार चे प्रास्ताविक आय.क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. एच. एम. पाटील यांनी केले तर या वेबिनारचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. देवरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय खंडारे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. बी. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.