Welcome to JES's Arts,Science and Commerce College, Nandurbar || Application for Admission 2025-26 || JES's ASC College is Accrediated 'B' Grade by NAAC

मानसशास्त्र विभागातील MA II वर्षाचा विद्यार्थी मगन रामदेव गावित हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत मानसशास्त्र विषयात 63 विद्यार्थ्यांत प्रथम आला, तसेच सामाजिक शास्त्रातील सर्व विषयांच्या 1662 विद्यार्थ्यांमध्ये देखील त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. विद्यापीठाच्या 30 व्या पदवी प्रदान सोहळ्यात त्याला कुलगुरूंच्या हस्ते दोन्ही सुवर्ण पदक देण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभाताई मोरे, उपाध्यक्ष बाबासाहेब विक्रांत जी मोरे, दादासाहेब अभिजित मोरे, दादासाहेब राऊ मोरे यांनी कौतुक केले. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. देवरे सर, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश मेश्राम सर, प्रा. भारत खैरनार सर व प्रा. हिम्मत रत्नपारखे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2022 jijamata Education Society - Powered By : NP INFOTECH